पत्र म्हणजे काय रे भाऊ?
खरच! पु ला देशपांड्यांच्या वाऱ्यावरची वरात मध्ये जसा नाटकात छोटा भाऊ दादा ला विचारतो " दारू म्हणजे काय रे भाऊ?" तसा आता पत्र म्हणजे काय रे भाऊ असा प्रश्न पडायला लागला आहे .
खरच आता कुठे पत्र वगैरे लिहिल्या जातात?
email आणि sms च्या काळात पत्र म्हणजे अगदी मासलेले वाटता ना... १८५७ च्या जमान्यातलं !
मला आठवता, राखी आणि भाऊबीजेची पत्र आई अगदी आठवणीने लिहायची. तिच्या आणि माझ्या, दोघांच्या नावाची....
जेव्हा कधी कधी ही पत्रं मला लिहावी लागायची तेव्हा अगदी राग यायचा - किती त्रास देते आई म्हणून.
पण मला पत्रांचे खरे महत्व कळले 8th मध्ये नागपूर ला आल्यावर. आई च्या अक्षरातून जणू तीच भेटायची मला. अगदी आतुरतेने तिच्या पत्रांची मी वाट बघत असायचे....
इथे गुरगाव ला आल्यावर अजूनही रोज घरी बोलना तर होता, तरी कधी तरी खूप एकटेपणा जाणवतो...
एकदा असाच आलेल्या ह्या एकटेपणा मध्ये काहीतरी उद्योग म्हणून हातात कागद पेन घेतला आणि नीरजा ला एक पत्रं लिहून काढला...
इतका छान वाटलं! पण त्याहुन छान वाटले ते पत्र मिळाल्यावर आनंदून तिचा आलेल्या phone वर तिच्याशी बोलताना..
emails , smses लवकर पोचतात, जास्त advanced आहेत हे खरा आहे, पण पत्रामधून जो आपलेपणा वाटतो ना तो दुसऱ्या कशातून नाही...
बोलणं विसरल्या जाता, पत्रं परत परत वाचता येतात...
मग माझे पत्रं लिहिणा चालू झाले... नीरजा, मावशी, आजी, अभिषेक, श्रेयस काका-काकू, भावंड, एक एक करत मी पत्रं लिहित गेले..
आणि खरच खूप छान वाटायला लागला. एकटेपणा कुठल्या कुठे पळून गेला...
इथे होस्टेल ला राहताना पत्रं आली कि अजूनच छान वाटतात.
लोक हसतात मला, अजूनही या technology driven age मध्ये काय पत्र लिहिते म्हणून..
पण खरा सांगू, मला पर्वा नाही कोण मला किती मागासलेले म्हणता त्याची. कारण हे मिळणारा समाधान सगळी कासार भरून काढता.
असाच मला USA postal department ची एक ad दिसली...
If you really want to touch someone, send them a letter.
अगदी खरा आहे...
मी तर माझ्या पत्रांचे सिलसिले चालूच ठेवेन, तुम्ही पण सुरुवात करून बघा...
:)