September 28, 2011

अखेरची कमाई


सध्या माझं नवा उपक्रम चालू आहे. कुसुमाग्रजांच्या कविता. असंच त्यांची एक कविता सापडली.
अगदी साधी. पण भरपूर बोलून जाणारी. जरा विचारच करायला लावणारी. 
कवितेचे नाव   :   अखेरची  कमाई

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे 
एका चौथऱ्यावर आले आणि टिपे गाळू लागले 
ज्योतिबा म्हणाले, शेवटी झालो मी फक्त माळ्यांचा 
शिवाजी राजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा
आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा
टिळक उद्गारले मी फक्त चित्तपावन ब्राह्मणांचा 
गांधीनी गळ्यातला गहिवर आवरला 
आणि ते म्हणाले - तरी तुम्ही भाग्यवान 
एक एक जात-जमात तरी तुमच्या पाठीशी आहे
माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

सकृत दर्शनी खूप विनोदी वाटणारी हि कविता खरा गेल्या ५० वर्षात लोकांनी सगळ्या महापुरुषांच्या  विचारांचा  आणि आदर्शांचा हवा तसं अर्थ लावलाय.
खरा पाहता खूप दुर्दैवी प्रकार आहे हा. 
पण खरच असं असायला हवं का ?
मला नाही वाटत कि कोणाला शिवाजी महाराज inspiring नसतील वाटत किवा ज्योतिबा फुल्यांनी केलेल्या स्त्री-शिक्षणाच्या सुरुवातीचा कोणाला विसर पडेल. 
आंबेडकर  गांधी आणि टिळकांचे भारताच्या सामाजिक अंड राजकीय जीवनातील अढळ स्थान कधी बदलेल. 
या सगळ्यांचा आदर करायला कोणाला एखाद्या विशिष्ठ समूह ओर समुदायाचा भाग असायला हवा. केवळ भारतीय किवा केवळ एक व्यक्ती असणं त्यासाठी पुरेसे आहे. 

Leia Mais…

September 23, 2011

Wallpaper and कुसुमाग्रज

It is quite strange. I was in my friend's room, we had to work on a case. He powered on his laptop and his wallpaper reminded me of कुसुमाग्रज 
No, he is not marathi, and I am sure he doesn't even know that a person called कुसुमाग्रज ever walked this earth. 
He had a lone tree as his wallpaper. Dry grassland and just a single tree. nothing living in sight - no animals, no birds, not even a single other tree.


It reminded me of a poem by कुसुमाग्रज - पाचोळा. 

आड वाटेला दूर एक माळ, तारू त्यावरी एकाला विशाल, 
आणि त्याच्या बिलगुनिया पदास, जीर्ण पाचोळा तो पडे उदास... 

A  few leaves had fallen and lay like neglected toys on the grass. Scorching sun burns them, the black scary night covers everything, rain drench the grassland, tree and the fallen leaves. The leaves on three turn and twist in wind as if laughing at the fallen leafy soldiers. 
And all of sudden, out of nowhere, a gush of wind blows all the leaves.....the land is cleared....for more leaves to fall down.

आणि अंती एक दिन त्या वनात, येई धावत चौफेर क्षुब्ध वात,
दिसे पाचोळा, घेरुनी तयाते, नेई उडवूनी त्या दूर दूर कोठे,
          आणि जागा मोकळी हो तळाशी, पुन्हा पडण्या वरतुनी पर्ण-राशी 

Actually this is the circle of life. Birth, youth, adulthood, old-age and death. And someone is already there in line to take place of the fallen.


Ms Abha S Bhuskute

Leia Mais…