मी SRKNEC मध्ये final year ला असताना लिहिलेली हि कविता.
आयुष्य एक वळणावळणाचा रस्ता, बदलत्या चित्रांचा चल-चित्रपट बोलका,
दोन्ही बाजूंना सुख-दुखाची झाडं, येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी मात्र उघडी ठेवा कवाडं
रस्त्याच्या सुरुवातीची असते सगळ्यांनाच जाण, पण पुढचा मात्र नसतो कोणालाच थांग,
तरीही पुढे पुढे जातच राहायचा असतं, पण प्रत्येक वळणावरून मागे नक्कीच बघायचं असतं,
पुढे जाताना ठेचकाळणं, दुखावणं असतं, पण मागे बघताना मन खरच सुखावतं,
आठवतात लहानपणाची कोडकौतुक, शाळेतल्या खोड्या आणि अभ्यासाची वह्या- पुस्तकं,
शाळा संपली, होती कॉलेज ची ओढ, फुलपाखरी दिवसांची आणि स्वप्नाची होती त्याला जोड,
कॉलेज मध्ये मात्र drawing sheets नी खूप रडवलं पण मित्रांसोबत मजा करणं कधी नाही सोडलं,
कॅन्टीन मधल्या गप्पांना रोज स्वल्पविरामच असायचा, उद्याच्या पेपर चा अभ्यास मात्र आज रात्रीच करायचा,
हि चार वर्षं वाळू सारखी सरली, आता फक्त आठवणीची संगत उरली,
संपले कॉलेज चे दिवस, संपली चढा-ओढीची गम्मत, आयुष्याच्या चढा-उतारात जाणवू दे मैत्रीची रंगत,
दिवस जातात वर्षही सरतात, रस्त्यांचेही बदलते चित्र, एकाच मागणं मागते, असेच फुलू दे आपले मैत्र.
आज अचानक खण आवरताना हातात आली.कॉलेज सोडूनही आता जवळपास २ वर्षं होत आली. आता तर postgraduation संपायचे दिवस जवळ येताहेत. तेव्हा पण परत असाच पोटात गोळा येईल, वाईट वाटेल, पुढे काय होईल-आयुष्य कोणत्या मार्गावर नेईल याची उत्सुकता असेल पण त्याच बरोबर हे सोनेरी दिवस संपले याची खंत पण असेल. पण आत्ता या क्षणी का त्याचा विचार करायचा? अजूनही माझे हे दिवस संपले नाहीत...
so enjoy baby...these days will not come again..
Leia Mais…