सध्या माझं नवा उपक्रम चालू आहे. कुसुमाग्रजांच्या कविता. असंच त्यांची एक कविता सापडली.
अगदी साधी. पण भरपूर बोलून जाणारी. जरा विचारच करायला लावणारी.
कवितेचे नाव : अखेरची कमाई
मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर आले आणि टिपे गाळू लागले
ज्योतिबा म्हणाले, शेवटी झालो मी फक्त माळ्यांचा
शिवाजी राजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा
आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा
टिळक उद्गारले मी फक्त चित्तपावन ब्राह्मणांचा
गांधीनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले - तरी तुम्ही भाग्यवान
एक एक जात-जमात तरी तुमच्या पाठीशी आहे
माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !
सकृत दर्शनी खूप विनोदी वाटणारी हि कविता खरा गेल्या ५० वर्षात लोकांनी सगळ्या महापुरुषांच्या विचारांचा आणि आदर्शांचा हवा तसं अर्थ लावलाय.
खरा पाहता खूप दुर्दैवी प्रकार आहे हा.
पण खरच असं असायला हवं का ?
मला नाही वाटत कि कोणाला शिवाजी महाराज inspiring नसतील वाटत किवा ज्योतिबा फुल्यांनी केलेल्या स्त्री-शिक्षणाच्या सुरुवातीचा कोणाला विसर पडेल.
आंबेडकर गांधी आणि टिळकांचे भारताच्या सामाजिक अंड राजकीय जीवनातील अढळ स्थान कधी बदलेल.
या सगळ्यांचा आदर करायला कोणाला एखाद्या विशिष्ठ समूह ओर समुदायाचा भाग असायला हवा. केवळ भारतीय किवा केवळ एक व्यक्ती असणं त्यासाठी पुरेसे आहे.
0 comments:
Post a Comment