Showing posts with label Marathi poetry. Show all posts
Showing posts with label Marathi poetry. Show all posts

December 20, 2011

काही गैरसमज

काही वर्षांपूर्वी अल्फा TV मराठी वर 'नक्षत्रांचे देणे' अशी कार्येक्रमांची मालिका होती. वेगवेगळे कालवंत, कवी, संगीतकार, लेखक अशांच्या कार्यावर आधारित हा कार्येक्रम होता.
पु ला देशपांडे यांच्या वर आधारित कार्येक्रम चालू होता आणि गाणं चालू झालं -

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी, ज्ञानेशाची 

आणि खाली कवी चे नाव आले - ग दि माडगुळकर !
अनेक वर्ष माझा असा गैरसमज होता कि "इंद्रायणी काठी" हे एक संत - भजन आहे. पण अचानक कळलं कि अरे, हि तर माडगुळकरांची कविता ! आणि मग हळू हळू असेच शोध लागत गेले.

नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा, होतसे विनाशु
हास्याच विलसे ओठी, अद्भुताची झाली गोठी
रातीचिये स्वप्नी आला, कोवळा दिनेशु
पहातली आशा नगरी, डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला, राउळी रमेशु
चैत वाऱ्याची वाहणी, आले देहाचे अंगणी
अंग मोहरूनी आले, जसा का पलाशु 
मनाचिये अंधाराचा, होतसे विनाशु 


 हे आशाबाईंच्या आवाजातले भजन  पण ज्ञानेश्वरांची रचना नाही तर गदिमांच्या लेखणीचा प्रताप आहे. ज्ञानेश्वर-कालीन भाषेचा इतका हुबेहूब परिणाम गदिमांनी साधला आहे कि खरच हि संत रचना आहे हे कोणालाही वाटेल. 
किती चतुरस्त्र कवी होते गदिमा याची प्रचिती त्यांची प्रत्येक रचना देते - मग ती मुक्त-कविता असू दे किंवा चित्रपट गीत असू दे. 

Leia Mais…

October 17, 2011

पुरिया


पुरिया खूप हळवा करणारा, कुठेतरी मनाच्या तळाला स्पर्शून जाणारा, अंतर्मुख करणारा  आणि हुरहूर लावणारा असतो. आधीच संध्यासमय मनातल्या हळव्या भावना बाहेर आणतो, त्याच्यात जर कानावर पडणारे पुरीयाचे आर्त सूर असतील तर स्वतःतच हरवून जायला होतं. याच पुरियाचा प्रत्यक्ष अनुभव ग दि मा आपल्या फक्त शब्दांनी उभे करतात- मग त्याला सुरांची हि गरज भासत नाही.

पुरिया.


फक्त शब्दातून दूर कुठेतरी उंच टेकडीवरच्या मंदिरातून हवेवर स्वर होऊन आलेले पुरीयाचे सूर कानावर पडायला लागतात, ती हळहळ, ती आर्तता, तो असह्य एकटेपणा, ते दुखः  आणि कातरवेळेची हुरहूर जाणवायला लागते. मग आपणही ह्याच काव्य-चित्राचा एक भाग होतो. हे फक्त शब्द नव्हेत, हि तर अनुभूती आहे.
ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे,
माझिया रक्तात ईश्वराचा अंश आहे.
हे शब्द त्याच्या बाबतीत अगदी खरे ठरतात.

Leia Mais…

September 28, 2011

अखेरची कमाई


सध्या माझं नवा उपक्रम चालू आहे. कुसुमाग्रजांच्या कविता. असंच त्यांची एक कविता सापडली.
अगदी साधी. पण भरपूर बोलून जाणारी. जरा विचारच करायला लावणारी. 
कवितेचे नाव   :   अखेरची  कमाई

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे 
एका चौथऱ्यावर आले आणि टिपे गाळू लागले 
ज्योतिबा म्हणाले, शेवटी झालो मी फक्त माळ्यांचा 
शिवाजी राजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा
आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा
टिळक उद्गारले मी फक्त चित्तपावन ब्राह्मणांचा 
गांधीनी गळ्यातला गहिवर आवरला 
आणि ते म्हणाले - तरी तुम्ही भाग्यवान 
एक एक जात-जमात तरी तुमच्या पाठीशी आहे
माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

सकृत दर्शनी खूप विनोदी वाटणारी हि कविता खरा गेल्या ५० वर्षात लोकांनी सगळ्या महापुरुषांच्या  विचारांचा  आणि आदर्शांचा हवा तसं अर्थ लावलाय.
खरा पाहता खूप दुर्दैवी प्रकार आहे हा. 
पण खरच असं असायला हवं का ?
मला नाही वाटत कि कोणाला शिवाजी महाराज inspiring नसतील वाटत किवा ज्योतिबा फुल्यांनी केलेल्या स्त्री-शिक्षणाच्या सुरुवातीचा कोणाला विसर पडेल. 
आंबेडकर  गांधी आणि टिळकांचे भारताच्या सामाजिक अंड राजकीय जीवनातील अढळ स्थान कधी बदलेल. 
या सगळ्यांचा आदर करायला कोणाला एखाद्या विशिष्ठ समूह ओर समुदायाचा भाग असायला हवा. केवळ भारतीय किवा केवळ एक व्यक्ती असणं त्यासाठी पुरेसे आहे. 

Leia Mais…