December 20, 2011

काही गैरसमज

काही वर्षांपूर्वी अल्फा TV मराठी वर 'नक्षत्रांचे देणे' अशी कार्येक्रमांची मालिका होती. वेगवेगळे कालवंत, कवी, संगीतकार, लेखक अशांच्या कार्यावर आधारित हा कार्येक्रम होता.
पु ला देशपांडे यांच्या वर आधारित कार्येक्रम चालू होता आणि गाणं चालू झालं -

इंद्रायणी काठी, देवाची आळंदी
लागली समाधी, ज्ञानेशाची 

आणि खाली कवी चे नाव आले - ग दि माडगुळकर !
अनेक वर्ष माझा असा गैरसमज होता कि "इंद्रायणी काठी" हे एक संत - भजन आहे. पण अचानक कळलं कि अरे, हि तर माडगुळकरांची कविता ! आणि मग हळू हळू असेच शोध लागत गेले.

नवल वर्तले गे माये, उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा, होतसे विनाशु
हास्याच विलसे ओठी, अद्भुताची झाली गोठी
रातीचिये स्वप्नी आला, कोवळा दिनेशु
पहातली आशा नगरी, डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला, राउळी रमेशु
चैत वाऱ्याची वाहणी, आले देहाचे अंगणी
अंग मोहरूनी आले, जसा का पलाशु 
मनाचिये अंधाराचा, होतसे विनाशु 


 हे आशाबाईंच्या आवाजातले भजन  पण ज्ञानेश्वरांची रचना नाही तर गदिमांच्या लेखणीचा प्रताप आहे. ज्ञानेश्वर-कालीन भाषेचा इतका हुबेहूब परिणाम गदिमांनी साधला आहे कि खरच हि संत रचना आहे हे कोणालाही वाटेल. 
किती चतुरस्त्र कवी होते गदिमा याची प्रचिती त्यांची प्रत्येक रचना देते - मग ती मुक्त-कविता असू दे किंवा चित्रपट गीत असू दे. 

0 comments:

Post a Comment