October 13, 2011

Ghar.

माझ्या आजी-आजोबाच्या घरात एक छोट्या कागदावर हि कविता लिहून भिंतीवर चिकटवलेली होती. आणि त्या वयात मला अर्थ जरी समजला नसला, तरी त्यातल्या यमकामुळे मला आवडली होती. नंतर मग पुढे कळलं कि हि विमल लिमये  यांची कविता.  या कवितेची आठवण येण्याचे कारण असे कि काल मला youtube वर श्रीधर फडक्यांनी गायलेली आणि स्वरबद्ध केलेली हि कविता surf करताना सापडली. 


घर.
घर असावे घरासारखे नकोत नुस्त्या भिंती 
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती

त्या शब्दाना अर्थ असावा नकोच नुसती वाणी 
सूर जुळावे परस्परांचे नकोत नुसती गाणी 

त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुस्ती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी नकोच नुसते पाणी 

या घरट्यातुनी पिल्लू उडावे दिव्य घेउनी शक्ति 
आकांक्षांचे पंख असावे उम्बर्ठ्यावर भक्ति 

मला फार आवडते हि कविता. घर - हि संकल्पना किती छान व्यक्त होते यातून....

मला हि कविता वाचली, ऐकली कि आजी आजोबांचे घर आठवत. एका खूप मोठ्या वाड्यात आजी आजोबा राहत असत. अंदाजे ६-७ कुटुंब राहत असतील त्या एका वाड्यात. माझे सगळा लहानपण तिथे गेलंय. मोठ्ठ अंगण आणि सुरेख बाग. बागेत जाई जुई चे वेळ आणि दारात फुलांच्या पायघड्या घालणारं पारिजताकाच झाड. एका balcony  मधून दुसऱ्या balcony मध्ये मारलेल्या गप्पा, खिडकी मधून होणारी पदार्थांची देवाणघेवाण, एकत्र साजरी केली जाणारी कोजागिरी आणि दिवाळी, सगळ्या बच्चेकंपनी ने सुट्टीमध्ये घातलेला धुडगूस.
हि कविता मला परत एकदा ४ वर्षांची frock मधली, दोन वेण्या घातलेली छोट्याश्या मुलीच्या जगात परत घेऊन जाते. 
काही गोष्टीच्या इतक्या घट्ट associations असतात ना...

0 comments:

Post a Comment